अन्नदान - विविध सेवा
दर गुरुवार व रविवार दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
सर्वात श्रेष्ठ, दानात दान अन्नदान. आपण सर्व आपले ऐहिक आयुष्य जगत असताना अनेक गोष्टींचा अंगीकार करतो. कुठेतरी समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपली अंशतः का होईना धडपड चालू असते. दानाचा विचार त्यातून येतो. आपले जगणे उन्नत होण्यासाठी, समाजातल्या वंचित वर्गाला आपलेसे करण्यासाठी, स्वामी महाराजांची शिकवण जोपामठातील उत्सव्यासाठी, स्वामी सेवेत स्वतःला तन मन धनाने समर्पित करण्यसाठी अन्नादानासारखे काहीच नाही. म्हणूनच मठाच्या माध्यमातून ठराविक प्रसंगी विशेष करून प्रत्येक गुरुवार व रविवार महाप्रसादाचे आयोजन केले जाते. स्वामी महाराजांचा हा प्रसाद घेऊन शेकडो भाविक तृप्त होतात. हे कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी मठाने अन्न छत्राची उभारणी केली. पिण्याच्या पाण्यासाठी प्रशस्त अशी विहीर बांधली. मठाचे अनेक कार्यकर्ते त्यासाठी मोठ्या मेहनतीने आणि शिस्तीने स्वामींचे हे कार्य पार पडण्यासाठी प्रयत्नशील असतात. तुम्ही सुद्धा ह्या कार्यात सहभागी होऊ शकता.
१) डाळ, तांदूळ, तेल,तूप, रवा, भाज्या, इत्यादी पदार्थांचे दान तुम्ही मठात करू शकता.
२) स्वतःचा अथवा आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसा प्रीत्यर्थ ठराविक रक्कम देणगी म्हणून देऊ
शकता.
स्वामींचे हे कार्य खचितच मोठे आहे. त्यासाठी कायम निधीची गरज भासते. आपल्यासारख्या दात्यांच्या भरीव योगदानातून हा संकल्प पूर्णत्वास जातो आहे हि महाराजांचीच कृपा.